* दोघांना अटक * सीबी कंट्रोलची कुर्ल्यात कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सीबी कंट्रोलच्या पथकाने कुर्लामधील क्रांतिनगर येथे छापा टाकून १४,५०० लिटर काळे ऑइल जप्त केले. यात ७० ड्रममधील या पेट्रोलियम द्रव्याची किंमत ११ लाख ३६ हजार ८६० रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, दुकान मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्ल्यातील क्रांतिनगरामधील बीएमके कम्पाउंडमध्ये एका गोदामात जळके ऑइल म्हणून ओळखले जाणारे पेट्रोलियम द्रव्याची काळा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे, अशी माहिती सीबी कंट्रोलच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला. तेथील काळे ऑइल असलेले ७० ड्रम जप्त केले. याप्रकरणी रामजी गौतम, रामदुलार पासी या कामगारांना अटक केली असून दुकानचालक नझीर खान व रमेश सोनी हे फरारी आहेत. याबाबत स्थानिक विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.