Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने व्यापाऱ्याला लुटणारे चौघे गजाआड

By admin | Updated: September 25, 2016 02:25 IST

व्यापाऱ्याजवळील १ कोटी ८७ लाखांच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने गजाआड केले आहे. मुकेशकुमार संघवी यांच्याजवळील

मुंबई : व्यापाऱ्याजवळील १ कोटी ८७ लाखांच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने गजाआड केले आहे. मुकेशकुमार संघवी यांच्याजवळील चार लुटारूंनी दागिन्यांनी भरलेली बॅग आणि सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून, तपास सुरू केल्याचे पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. सहपोलीस आयुक्त गुन्हे संजय सक्सेना आणि कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने तपास सुरू केला. यातील टॅक्सीचालक शहानवाज खान आणि जहांगीर शेख यांना शिवाजीनगर प्रफुल्ल गायकवाड याला मिरारोड आणि वाशीतून गुन्ह्यातील चौथा आरोपी रतन सिंगला अटक केले. (प्रतिनिधी)