Join us

दोन पोलिसांसह चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:03 IST

एका ज्वेलर्सची फसवणूक करून त्याच्याकडून २४ लाखांचे हिरे लंपास करण्यात आले. याप्रकरणी बोरीवली पोलिसांनी दोन पोलीस कर्मचाºयांसह चौघांना गुरुवारी अटक केली आहे.

मुंबई : एका ज्वेलर्सची फसवणूक करून त्याच्याकडून २४ लाखांचे हिरे लंपास करण्यात आले. याप्रकरणी बोरीवली पोलिसांनी दोन पोलीस कर्मचाºयांसह चौघांना गुरुवारी अटक केली आहे. चंद्रकांत गवरे, संतोष गवस, प्रणय शाह आणि सुजाता गावकर अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. गवरे आणि गवस हे पोलीस कर्मचारी आहेत.गुजरातच्या हिरे व्यापाºयाला या चौघांचा पाचवा साथीदार राज याने फोन केला. तसेच हिरे खरेदी करण्याची इच्छा दर्शविली. बुधवारी एका आॅफिसमध्ये गावकर आणि शाह यांनी व्यापाºयाला बोलावले. तेव्हा बोरीवलीतील एक व्यापारी देखील त्याच्यासोबत होते. हिºयांबाबत बोलणी सुरू असताना अचानक गवस आणि गवरे त्या ठिकाणी आले. या ठिकाणी बेकायदेशीररीत्या हिºयाचा व्यवहार सुरू आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असे त्यांनी सांगत गुजरातच्या व्यापाºयाचे २४ लाखांचे हिरे ताब्यात घेतले. एक मोबाइल नंबर त्यांना देऊन ते दोघे हिरे घेऊन निघाले आणि सायंकाळी पोलीस आयुक्तांच्या आॅफिसमध्ये या, असे त्यांना सांगितले. मात्र, तो नंबर बंद असल्याने व्यापाºयाला संशय आला. त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा सीसीटीव्हीमध्ये पोलिसांनी एका पोलीस कर्मचाºयाला ओळखले व त्यांना अटक केली. त्यानंतर गावकर, शहाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तेरा लाखांचे हिरे हस्तगत केले.