Join us
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी कपिल राजपूतसह चौघांना अटक

By admin | Updated: February 14, 2016 00:32 IST

साडेसहा कोटी रूपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात द्वारका मिल्कचे व्यवस्थापकीय संचालक कपिल राजपूत याच्यासह चार जणांना वाशी पोलिसांनी शनिवारी दिल्ली येथे अटक केली.

नवी मुंबई : साडेसहा कोटी रूपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात द्वारका मिल्कचे व्यवस्थापकीय संचालक कपिल राजपूत याच्यासह चार जणांना वाशी पोलिसांनी शनिवारी दिल्ली येथे अटक केली. मात्र अटकेच्या कारवाईदरम्यान प्रकृती खालावल्याने राजपूत याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वी वाशी पोलीस ठाण्यात या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींनी अनेक बँकांना सुमारे दिडशे कोटी रूपयांना गंडा घातला असल्याची तक्रार असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)