Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:04 IST

मोखाडा येथील दुर्घटना : दोघांची प्रकृती चिंताजनकलोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : तालुक्यातील ब्राह्मणपाडा येथील अनंता बाळू मौळे यांच्या ...

मोखाडा येथील दुर्घटना : दोघांची प्रकृती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्क

मोखाडा : तालुक्यातील ब्राह्मणपाडा येथील अनंता बाळू मौळे यांच्या दुकान व घराला रविवारी मध्यरात्री २.३० वाजता शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

आग इतकी भयानक होती की, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यात दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला तर घरातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. दोन जण भाजल्यामुळे त्यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

ब्राह्मणपाडा स्टॉप येथील अनंता बाळू मौळे यांच्या घराला लागूनच होलसेल किराणा मालाचे दुकान होते. त्यात मध्यरात्री २.३०च्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. यात घरात अनंताची चार मुले, आई व पत्नी असे सात जणांचे कुटुंब राहत होते. आगीत झोपलेल्या वृद्ध आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, मुलगी पल्लवी मौळे (१५), तर मुलगा कृष्णा मौळे (१०) या चौघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला. मुलगा भावेश मौळे (१२) व मुलगी अश्विनी मौळे (१७) हे दोघे भाजले असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

अनंता मौळे यांना डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना मोखाडा येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.