Join us

एक्स्प्रेस-वेवर चार ठार

By admin | Updated: November 23, 2014 01:14 IST

मुंबई-पुणो एक्स्प्रेस-वेवर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

खालापूर : मुंबई-पुणो एक्स्प्रेस-वेवर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हे सर्व जण देवदर्शन घेऊन परतत होते. 
मुंबईतील धारावी परिसरातील मिलिंद सुर्वे यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी गेल होते. तेथून परतत असताना त्यांच्या तवेरा गाडीचा (एम एच 43 ए 2838) टायर फुटला. भरधाव वेगात असणारी गाडी रस्त्याच्या बाजूला 15क् फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, गाडीतील विजया पवार (7क्), सुरेखा रामचंद्र पवार (4क्), कुंदा मिलिंद सुर्वे (35), आयुष मिलिंद सुर्वे (4) हे जागीच ठार झाले. तर  अर्चित मिलिंद सुर्वे (9) आणि काशिनाथ गणपत पवार हे जखमी झाले. त्यांना पनवेल येथील अष्टविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य
तवेरा गाडी पहाटे साडे तीनच्या सुमारास खोल दरीत पडल्याचे एका टेम्पोचालकाने पाहिले. त्याने आयआरबी आणि डेल्टा फोर्सच्या कर्मचा:यांना त्वरित माहिती दिली. बोरघाट आणि खोपोली पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. गिर्यारोहक गुरु नाथ साठीलकर यांच्या मदतीने पोलीस अंधारातच खोल दरीत उतरले. तेव्हा एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज त्यांना आला आणि त्यांनी अर्चित सुर्वेला बाहेर काढले. गाडीतून जखमी व्यक्तींना आणि मृतदेहांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. अखेर क्रेनला सेफ्टी बेल्ट अडकवून सर्वाना बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)
 
मृतांची नावे 
कुंदा मिलिंद सुर्वे (35)
आयुष मिलिंद सुर्वे (4)
सुरेखा रामचंद्र सुर्वे (4क्) 
विजया पवार (7क्) 
 
दरीत भंडारा 
उधळला गेला
सुर्वे कुटुंबीय कर्नाटकमधील देवीच्या दर्शनाला गेल्याचे समजते. अपघातानंतर घटनास्थळी देवीची ओटी भरण्याचे साहित्य, भंडारा, नारळ, साडी चोळी, पैसे, तांदूळ, देवीचा फोटो असे धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. खोल दरीत भंडारा उधळल्याचे दिसत होते.