Join us

स्मशानभूमीसाठी चार कोटी

By admin | Updated: August 20, 2014 22:30 IST

आधुनिक प्रगत तंत्रज्ञानांनी युक्त अशी उभारण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण योजनेतून चार कोटींचा निधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला आहे.

पालघर : पालघर नगरपलिका क्षेत्रतील स्मशानभूमी व कब्रस्तान ही अत्यंत नियोजनात्मक व आधुनिक प्रगत तंत्रज्ञानांनी युक्त अशी उभारण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण योजनेतून चार कोटींचा निधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला आहे. काल रात्री राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी सर्व ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिका:यांना सूचना दिल्या.
पालघर नगरपालिका क्षेत्रतील पूर्व भागातील नवली, वेवुर, घोलविरा तर पश्चिम भागातील टेंभाडे, अल्याळी मधील स्मशानभूमी व कब्रस्तानाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असे. त्यामुळे पालघर शहरात अद्ययावत पध्दतीने स्मशानभूमी बांधण्यात यावी यासाठी पालघरच्या विo्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री गावित, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, मुख्याधिकारी वैभव आवारे, उपअभियंते महेंद्र किणी, विरोधी गटनेते मकरंद पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केदार काळे, तालुका चिटणीस निलेश राऊत, सुरेंद्र शेट्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंजूर केलेल्या चार कोटींच्या वैशिष्टय़पूर्ण योजनेच्या निधीतून प्रथम वेवुर व टेंभाडे येथील स्मशानभूमीमध्ये डिझेल, इलेक्ट्रीक व लाकडे असे तिन्ही प्रकारच्या शवदाहिन्या ठेवण्यात याव्यात अशा सूचना उपस्थितांनी मांडल्या. यावेळी गुजरात (पाटण) येथील सतिपुर येथील अद्ययावत स्मशानभूमीचे मॉडेल, शवदाहिनीचे मॉडेल चित्रे उपनगराध्यक्ष उत्तम घरत यांनी सर्वासमोर मांडली. यावेळी पालघरमध्ये नक्षत्र गार्डनचे काम सुरू असून त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पालघर शहराची ओळखच बदलून जाईल असा विश्वास राज्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी नगरपरिषद हद्दीत नव्याने उभारलेल्या काही रस्त्यांचा दर्जा निकृष्ट राहिल्याने क्वालिटी कंट्रोल विभागाकडून या रस्त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)