Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्रीत चार घरफोड्या

By admin | Updated: September 23, 2014 23:20 IST

कोलाड पोलीस ठाण्याजवळील पाले खुर्द गावात काल रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी चो-या व घरफोड्या करून लाखो रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली

रोहा : कोलाड पोलीस ठाण्याजवळील पाले खुर्द गावात काल रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी चो-या व घरफोड्या करून लाखो रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोहे तालुक्यातील कोलाड येथील पालेखुर्द गावातील भालचंद्र काशिनाथ चितळकर यांच्या घरात रात्रीच्या वेळी काही अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दोन लाख ३८ हजार रुपये किमतीचे दागिने व ५५०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर त्यांनी गावातील शेजारी राहणारे राम गणपत ठाकूर यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून सामानाची नासधूस केली व काळभैरव मंदिर, बुध्द विहाराच्या मंदिरात चोरीचे प्रयत्न केले. या चोरी-घरफोडी सत्रात ४ ते ५ जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या चोरांविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साळवे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)