Join us

वर्कशॉपमधून चोरी करणा-या चौघांना अटक

By admin | Updated: November 21, 2014 23:18 IST

करंजा गावातील दोन वर्कशॉपमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी चार गुन्हेगारांना पकडण्यात उरण पोलिसांना यश आले आहे.

उरण : करंजा गावातील दोन वर्कशॉपमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी चार गुन्हेगारांना पकडण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. यापैकी तीन बालगुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीचे काही सामानही जप्त केले.उरणच्या करंजा गावामध्ये मासेमारी नौकांना लागणारे साहित्य बनविणारे आणि जुने सामान दुरुस्त करणारे अनेक वर्कशॉप आहेत. यासाठी मासेमारी नौकांसाठीच्या इंजिनियरिंग सामानाची निर्मिती केली जात असल्याने त्यासाठी तांबा, पितळेच्या महागड्या धातूच्या वस्तूच वापराव्या लागत आहेत. यात लोखंडी सामान वापरल्यास ते गंजण्याची शक्यता असल्याने तांबा, पितळेच्या रॉडपासूनच वस्तूंची घडवणूक केली जाते. चोरांनी हेच हेरुन या परिसरातील वर्कशॉपमधून केवळ तांबा, पितळेच्या वस्तूच चोरण्याचा धडाका दहा - बारा दिवसांपासून लावला आहे. अशाच प्रकारची चोरी मागच्या शुक्रवारी रात्री हरेश्वर नाखवा यांच्या हरेश इंजिनियरिंग वर्कशॉपमधून एका डब्यात ठेवलेले तांबा - पितळीचे विविध बुश आणि वेल्डिंग मशिनची वायर पळवली होती, तर कमळाकर पाटील यांच्या वर्कशॉपवरही चोरांनी डल्ला मारला होता. (वार्ताहर)