Join us
Daily Top 2Weekly Top 5

खारमधील हत्येप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: October 1, 2015 02:14 IST

खार पश्चिम परिसरात सोमवारी झालेल्या रिझवान खान (२२) या तरुणाच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी चार जणांना अटक केली

मुंबई : खार पश्चिम परिसरात सोमवारी झालेल्या रिझवान खान (२२) या तरुणाच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी चार जणांना अटक केली. यात एका तरुणीचाही समावेश असून ही तरुणी हत्येची मुख्य सूत्रधार असल्याचे खार पोलिसांनी सांगितले.झोया खान (१९), दानिश शेख (१९), समीर खान (१८) आणि एजाझ सय्यद (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मयत रिझवान हा झोयासोबत मैत्री करू पाहत होता. जे तिला आवडत नव्हते. याबाबत तिने त्याला बजावले होते. मात्र तो ऐकत नव्हता. अखेर तिने अन्य तीन मित्रांसोबत मिळून रिझवानचा काटा काढण्याचे ठरविले.सोमवारी रात्री झोयाने रिझवानला फोन करून कार्टर रोड परिसरात भेटण्यास बोलावले. त्या ठिकाणी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्या वेळी याच परिसरात दबा धरून बसलेल्या झोयाच्या मित्रांनी त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. न्यायालयाने आरोपींना तीन आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)