Join us

चाळीस हजारांची गावठी दारु जप्त

By admin | Updated: September 29, 2014 00:26 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील चार फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे.

कर्जत : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील चार फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. या नाकाबंदीत पोलिसांनी चाळीस हजारांची गावठी दारु पकडली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास मोटारसायकलवरून संशयास्पदरीत्या टायरच्या ट्यूबमधून घेऊन जाताना विकास तरे व सागर कराळे (दोन्ही रा. बेकरे) हे पोलिसांना दिसल्यावर त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे दारूचा साठा सापडला. (वार्ताहर)