Join us

वांद्रे येथे चाळीचा भाग कोसळला; १६ जणांची सुखरूप सुटका, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:07 IST

वांद्रे येथे चाळीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यूपाच जखमी; १६ जणांची सुखरूप सुटकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

वांद्रे येथे चाळीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

पाच जखमी; १६ जणांची सुखरूप सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी रोड येथील रज्जक चाळीच्या बांधकामाचा भाग रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास काेसळून रियाझ अहमद (२८) यांचा मृत्यू झाला. जखमी पाच जणांवर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्यापूर्वीच स्थानिकांनी प्राणाची बाजी लावून सहा जणांना दुर्घटनाग्रस्त बांधकामाच्या ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढले, तर मुंबई अग्निशमन दलाने उर्वरित ११ जणांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला.अशाप्रकारे १७ लाेकांना बाहेर काढण्यात आले, मात्र यातील रियाझला ते वाचवू शकले नाहीत

वांद्रे येथे रविवारी मध्यरात्री २ वाजता घडलेल्या या दुर्घटनेतील जखमींना वांद्रे येथील भाभा आणि व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. व्ही.एन. देसाई रुग्णालयाचे डॉ. शशांक व स्टाफ नर्स हर्षदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ अहमद, मेला सलमान अतिक खान, राहुल मोहन खोत, रोहन मोहन खोत, लता मोहन खोत या जखमींवर उपचार सुरू आहेत. तर, रियाझ अहमद (२८) यांचा मृत्यू झाला असून, नुराल हक्क हैदर अली सय्यद हे किरकोळ जखमी झाले आहेत.

.........................................