Join us  

राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 9:37 AM

राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन झाले आहे.

मुंबई- राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होते. बोंगीरवार हे 1966 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी सरकारच्या विविध खात्यांमध्ये आयएएस अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.तसेच त्यांनी महाराष्ट्रातील 25 वे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. बोंगीरवार यांच्यामागे मुलगी दीप्ती, गार्गी आणि मुलगा पीयूष असं कुटुंब आहे. बोंगीरवार हे मूळचे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातले असून, त्यांनी उस्मानाबाद आणि नागपूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी  पदावरही काम केलं होतं. तसेच ते औरंगाबाद, पुणे आणि कोकणचे विभागीय आयुक्त होते.महसूल खात्यामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी बोंगीरवार कमिटीचे नेतृत्वही केले होते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या दोन मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तसेच पुण्याचे महापालिका आयुक्तपद भूषवण्याचीही त्यांना संधी मिळाली होती. 1999मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.