Join us  

मोठी बातमी! सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 5:48 PM

सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी शिवसेनेच्या चार माजी नगरसेवकांना अटक

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. महाडेश्वर यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे नसल्याचं समजतं. त्यामुळे थोड्याच वेळात महाडेश्वर यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले आहेत. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली. या हल्ल्याप्रकरणी माजी  महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली आहे.

सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या चार माजी नगरसेवकांना अटक झाली आहे. दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, हाजी अलीम यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यांच्याविरोधात जामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. 

टॅग्स :किरीट सोमय्याविश्वनाथ महाडेश्वर