Join us

माजी आमदार शेख शमीम अहमद यांचे दु:खद निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 22:50 IST

शेख सलीम विधानसभेमध्ये मुस्लिम बांधवांबाबत मुद्दे ठामपणाने मांडत होते.

मुंबई : भायखळा चिंचपोकळीचे माजी आमदार शेख शमीम अहमद यांचे आज 21 सप्टेंबर रोजी आकस्मिक निधन झाले. शमीम अहमद 1980 मध्ये भायखळा चिंचपोकळी मतदार क्षेत्रात इंडियन नॅशनल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती.

शेख सलीम विधानसभेमध्ये मुस्लिम बांधवांबाबत मुद्दे ठामपणाने मांडत होते. मात्र, राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे ते दुखावले गेले होते. यामुळे त्यांनी नव्वदीच्या दशकात राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, प्रख्यात शायर उबेद आझम आझमी व शेख अब्दुररेहमान ही दोन मुले आहेत.