Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sudhir Patankar Death: दूरदर्शनचे माजी निर्माते सुधीर पाटणकर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 11:12 IST

Sudhir Patankar Death: दूरदर्शनचे ज्येष्ठ माजी निर्माते सुधीर पाटणकर यांचं आज सकाळी मुंबईत अल्पशा आजारानंतर निधन झालं.

मुंबई- दूरदर्शनचे ज्येष्ठ माजी निर्माते सुधीर पाटणकर यांचं आज सकाळी मुंबईत अल्पशा आजारानंतर निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. कोर्टाची पायरी, आजचे पाहुणे, युवदर्शन, आमची पंचवीशी, साप्ताहिकी, बातम्या, या कार्यक्रमांच्या शेकडो भागांची तसंच प्रतिभा आणि प्रतिमा च्या काही भागांचीही त्यांनी निर्मिती केली होती. मराठी रंगभूमीविषयी त्यांचा उत्तम अभ्यास होता. तंत्रावर प्रभुत्व असलेले, शांत स्वभावाचे पण शिस्तप्रिय निर्माते म्हणून सहका-यांमध्ये व कलाकारांना ते प्रिय होते. मूळचे नागपूरचे असलेले पाटणकर 35 वर्षांच्या दूरदर्शन सेवेनंतर निवृत्त होताना सहाय्यक संचालक झाले होते.