Join us

बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती ठीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:31 IST

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहितीबार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती ठीकराज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहितीलोकमत ...

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती ठीक

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याची प्रकृती चांगली असल्याची महिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.

तळोजा कारागृहात दासगुप्ता याची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्या. पी.डी. नाईक यांच्या एकसदस्यीय खंडपीठाला दिली.

दरम्यान, दासगुप्ता यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, दासगुप्ता याची तब्येत ठीक नसून वारंवार तो बेशुद्ध होत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, अशी महिती दासगुप्ता याच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.

१९ जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयाने दासगुप्ता याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.