Join us  

वनसंपदाच टिकवेल पक्ष्यांचा अधिवास! वनविभागाला विश्वास; मालाड, कांदिवलीत झाडांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 2:33 AM

मालाड व कांदिवली पूर्वेलगत असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत काही वर्षांपूर्वी अनधिकृत झोपडपट्टी वसली होती. वनविभागाच्या हद्दीत मनुष्यवस्ती निर्माण झाल्याने वनसंपदेची हानी झाली. परिणामी, पक्षी व प्र्राण्यांनी स्थलांतरण केले.

- सागर नेवरेकरमुंबई : मालाड व कांदिवली पूर्वेलगत असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत काही वर्षांपूर्वी अनधिकृत झोपडपट्टी वसली होती. वनविभागाच्या हद्दीत मनुष्यवस्ती निर्माण झाल्याने वनसंपदेची हानी झाली. परिणामी, पक्षी व प्र्राण्यांनी स्थलांतरण केले. २००७-०८ साली वनविभागाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन झाल्यावर, तिथे वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. वनविभाग, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा) यांच्यातर्फे वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आल्याने, पाच हजार वृक्षसंख्या असलेल्या या भागात आजघडीला पंधरा हजार वृक्ष असल्याचा दावा प्रतिष्ठानने केला आहे. येथील वनसंपदेत भर पडल्याने, येथून स्थलांतरित झालेले पक्षी पुन्हा मूळ अधिवासात परतल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.शहराबाहेर पक्षी स्थलांतर करताना दिसतात. मात्र, मालाड परिसरात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रमांतर्गत बरीच झाडे लावली व ती जगविण्यातही आली.वनविभागातर्फे येथे अनेक प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे लावली आहेत. त्यामुळे पक्षी मूळ अधिवासात परतू लागल्याची माहिती पक्षी निरीक्षकांनी दिली. ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे.परतलेल्या पक्ष्यांचे सुंदर छायाचित्र वाइल्ड लाइफ फोटोग्राफरने कॅमेºयामध्ये कैद केले आहे. तांबट पक्षी, देशातच आढळणारा स्वर्गीय नर्तक, पिंगळा, कोतवाल, भारद्वाज, कोकिळ, साळुंकी, शिंपी, राखी वटवट्या, वेडा राघू, मोठा खंड्या, घार, चिमणी, कावळा, मैना, रंगीत मैना, जंगल मैना, हळद्या, काळ्या मानेचा हळद्या, पोपट, पारवा, गाय बगळा, पाणकोंबडी, सूर्यपक्षी, छोटा सूर्यपक्षी, जांभळा शिंजिर, गप्पीदास, चिपका, चिरक छोटा कोळीखाऊ, ठिपकेवाला नाचरा, होला, तांबुला, दयाळ, धनेश, खाटीक, नीलिमा, नीलमणी, पाणकोंबडी, भोरडी, शाही बुलबुल असे अनेक पक्षी येथे आढळतात. सोबतच अनेक प्रकारची फुलपाखरे आणि कीटक आढळून येतात. गेल्या सहा ते सात वर्षांत पक्षी, फुलपाखरे यांच्यात वाढ दिसून येते, अशी माहिती वन्यजीव छायाचित्रकार आणि वन्यजीव अभ्यासक प्रवीण दौंड यांनी दिली.मालाड परिसरात ७ जुलै २०१३ रोजी साडे नऊ एकरमध्ये पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यात फणस, काजू, आंबा, शिसम, साग, चिंच, जांभूळ अशा अनेक झाडांचा सामावेश आहे. ‘करंज’ हे जास्तीतजास्त आॅक्सिजन देणारे झाड असून त्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तसेच काही औषधी वनस्पती झाडांची देखील लागवड करण्यात आली आहे. मालाडमध्ये वृक्षांची संख्या पाच हजार असून रोपवाटिकेमध्ये १० हजार झाडे आहेत. कांदिवली येथील रामगड भागात ३९ एकरमध्ये १२ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षांच्या लागवडीमुळे परिसरात पक्ष्यांचा वावर वाढत आहे.- प्रसाद चौघुले, सदस्य,डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमालाड, कांदिवली येथील वनविभागाच्या जागेवर वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जातो. झाडांचे संर्वधनही केले जाते. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या रहिवाशांनीही वृक्ष लागवड करत, वनसंपदेत भर घातली पाहिजे.- पंकज कुंभार, वनरक्षकमोबाइल टॉवरची संख्या वाढल्याने पक्ष्यांनी स्थलांतर केले. रेडिएशनमुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. झाडांवर पडणाºया अळ्या खाऊन पक्षी जगतात, परंतु आता झाडेच शिल्लक नसल्याने पक्ष्यांना खाद्य मिळत नाही. त्यामुळे पक्षी मूळ अधिवास सोडून दुसºया ठिकाणी अधिवास करतात. त्यामुळे फळझाडे, फुलझाडे लावायला हवीत.- स्वप्निल सोनवणे,वाइल्ड फोटोग्राफर

टॅग्स :जंगलमुंबई