Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या शोध मोहिमेसाठी वनखाते सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

मुंबई : न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या इन्फिनिटी आयटी पार्कलगत असलेल्या गिरीकुंज सोसायटी, इमारत क्रमांक 5 ते इमारत क्रमांक 8 ...

मुंबई : न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या इन्फिनिटी आयटी पार्कलगत असलेल्या गिरीकुंज सोसायटी, इमारत क्रमांक 5 ते इमारत क्रमांक 8 च्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीवरून

बिबट्याचा काल दिवसाढवळ्या मुक्त संचार होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आमदार सुनील प्रभू यांनी लगेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आणि वन विभागाच्या सचिवांशी आणि ठाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

आणि मग शासकीय यंत्रणा व वन विभागाने तत्परता दाखवीत कामाला लागली. ठाणे वन विभागाचे वन अधिकारी रामराव यांनी सोसायटीत त्यांचे पथक पाठविले अशी माहिती डॉ. रामेश्वरी पाटील यांनी दिली.

आज वन खात्याचे अधिकारी येथे आले होते आणि

बिबट्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी वन खात्याने येथे कॅमेरा लावला आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता वन विभागाचे अधिकारी गिरीकुंज सोसायटीत येणार असून, बिबट्यापासून काळजी कशी घ्यायची याचे मार्गदर्शन येथील नागरिकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच येथील सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीची उंची वाढवून त्यावर तारेचे कुंपण घालण्यासाठी वन खात्याने येथील एका खाजगी

बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्याची

माहिती त्यांनी दिली, तसेच बिबट्या येथील संरक्षक भिंतीला असलेल्या झाडावरून उडी मारून येथील आवारात येत असल्याने येथील गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या मोठ्या झाडांची छाटणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रामेश्वरी पाटील यांनी दिली.

--------------------------------------------