Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या चरणी विदेशी फुलांची सजावट

By admin | Updated: September 7, 2016 03:21 IST

अवघ्या मुंबापुरीचे दैवत असणाऱ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तगणांची रीघ सुरू आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंदिर

मुंबई : अवघ्या मुंबापुरीचे दैवत असणाऱ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तगणांची रीघ सुरू आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंदिर परिसरात विदेशी फुलांची विशेष सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड, बँकॉक अशा सातासमुद्रापार असणाऱ्या देशांतून सिद्धिविनायकाच्या चरणी विदेशी फुलांची भेट आली आहे. या सजावटीसाठी गेले अनेक दिवस दिल्लीतील के.के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरास करण्यात आली आहे. यासाठी ३००हून अधिक कारागीर सिद्धिविनायक मंदिरानजीक सजावट करण्यात मग्न दिसून येत होते.