Join us
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चालकाच्या धडकेत परदेशी नागरिक जखमी

By admin | Updated: November 8, 2015 00:29 IST

द्यधुंद अवस्थेत ह्युंदाई कारने सुसाट निघालेल्या हॉटेल व्यवस्थापकाने टॅक्सीची वाट पाहत असलेल्या एका परदेशी नागरीकाला धडक दिली. या अपघातात

मुंबई : मद्यधुंद अवस्थेत ह्युंदाई कारने सुसाट निघालेल्या हॉटेल व्यवस्थापकाने टॅक्सीची वाट पाहत असलेल्या एका परदेशी नागरीकाला धडक दिली. या अपघातात परदेशी नागरिक जखमी झाला. अटकेच्या भितीने पळ काढत असताना वाटेतील तीन टॅक्सीना धडक देत चालकाची कार लोखंडी खांबावर आदळली. या प्रकरणी एन.एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कारचालक अनुप ब्रीजभूषण पांडेला अटक करण्यात आली आहे.डेन्मार्क येथील रहिवासी असलेले लुकास डेव्हीस (२४) मुंबईत पर्यटनासाठी आले होते. शनिवारी सकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास लोअर परेल येथील सेनापती बापट मार्ग येथे ते टॅक्सीची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या पांडे याच्या हुंडाई कारने त्यांना धडक दिली. स्थानिकांनी डेव्हीस यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी)