मुंबई : शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, गुरुवारी हेच तापमान १५.८ अंश नोंदविण्यात आले होते. शुक्रवारी किमान तापमानात दोन अंशाची वाढ झाली असली, तरी पुढील ४८ तास गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.‘ओखी’ चक्रिवादळानंतर मुंबईतील वातावरणात चढ-उतार जाणवू लागले आहेत. वाहणारे गार वारे आणि तापमानात होत असलेली घट, या दोन प्रमुख घटकांमुळे मुंबईतला गारवा कायम आहे. रात्रीसह सकाळी वाहणारे गार वारे थंडीत आणखी भर घालत आहेत. त्यामुळेच शनिवारसह रविवारी किमान तापमान १८ ते २० अंशाच्या आसपास राहील, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने सांगितले. परिणामी, पुढचे किमान ४८ तास थंडीचे आहेत.किमान तापमान(अंश सेल्सिअस)औरंगाबाद १६.२महाबळेश्वर १५.७नाशिक १३पुणे १४.६सातारा १४.५सोलापूर १६.१गोंदिया ११.५नागपूर १४.६वर्धा १५.५अहमदनगर १४.७मालेगाव १५.२माथेरान १३.५
पुढील दोन दिवस गारठा कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 02:17 IST