Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे जबरदस्ती लग्न; देहविक्रीसाठी केले बाध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:07 IST

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून नंतर तिला देहविक्रीसाठी बाध्य केल्याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाईन लोकमतमुंबई: अल्पवयीन मुलीचे लग्न लावून नंतर तिला देहविक्रीसाठी बाध्य केल्याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भातील हकीकत अशी की, अल्पवयीन मुलीचे तिच्या आईने, छाया रमेश जाधव हिने मुलीच्या मनाविरुद्ध राहुल राजा बुधावले याच्याशी लग्न लावून दिले. राहूलने फिर्यादीला वारंवार मारहाण केली व तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारीरीक संबंध ठेवला. या प्रकारामुळे ही मुलगी आईजवळ येऊन रहात असताना, आईनेच तिला देहविक्रीसाठी आशा खंडागळे या महिलेच्या स्वाधीन केले. त्यानंतर आशाने फिर्यादी तरुणीला एका अनोळखी इसमासोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्यास बाध्य केले. याप्रकरणी पोलिसांनी राहुल राजा बुधावले, आकाश खंडागळे, रवी रमेश जाधव, छाया रमेश जाधव व आशा खंडागळे यांना अटक केली आहे.

टॅग्स :वेश्याव्यवसाय