Join us  

माणूसकीचा धर्म पाळत पूरग्रस्तांसाठी आजीने दिले चक्क बिस्किटाचे पूडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 1:30 PM

मुंबईकर देखिल पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करत असल्याचे चित्र आहे.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: महाराष्ट्रात आलेल्या संकटाना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या प्रमाणात अन्न धान्य,कपडे, भांडी, जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करण्यासाठी अनेक शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक व शिवसैनिक, युवा सेना मदतीसाठी पुढे आली आहे.मुंबईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक भागातून मदत फेऱ्या सुरू झाल्या आहेत, तर अनेक ट्रक भरून मदत साहित्य घेऊन शिवसेनेचे पदाधिकारी पुरग्रस्त भागात गेले आहेत.तर मुंबईकर देखिल पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करत असल्याचे चित्र आहे.

शिवसेना शाखा क्रमांक २०६ तर्फे काल शिवडी नाका टी.जे.रोड येथे मदत फेरी काढण्यात आली होती.हात माझे दगडाखाली.....मदत मी काय करू,झोळी माझी रिकामी दान मी काय करू,हरली आहे सगळ्याच बाजूने तरीदेखील माणुसकी धर्म नका विसरू, एकमेकां साह्य करू अशी साद घालत पूरग्रस्तांसाठी चक्क बिस्किटाचे पूडे या आजीने दिले. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली

शिवडी विभागातील दोस्ती फ्लेमिंगोच्या गेट बाहेरील बसणारी एक आजी. हि आजी तशी सर्वांच्या परिचयाची.गेली ४० वर्षांपासून आजी तेथे मातीचे मडके बनून विकते हा तिचा व्यवसाय. दहीहंडीच्या वेळेस  शिवडीकर या आजीकडे मडके घेण्यासाठी येतात.कोरोनामुळे या आजीला व्यवसायातून तिला पोटापाण्यासाठी देखील कमविणे थोडे कठिण झाले आहे. या मदतफेरीला या आजीने गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे याची ग्वाही देत  सढळ हस्ते या पूरग्रस्तांसाठी बिस्किटाचे पूडे दिले अशी माहिती  नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली. 

टॅग्स :पूरमुंबई