Join us

राज्य एड्स नियंत्रण संस्था घेतेय फॉलोअप

By admin | Updated: November 27, 2014 01:22 IST

एखाद्या रुग्णाने आौषध घेणो सोडल्यास त्याचा आजार बळावतो, हा सर्वसामान्य नियम सर्वच आजारांना लागू होणारा आहे.

पूजा दामले ल्ल मुंबई
एखाद्या रुग्णाने आौषध घेणो सोडल्यास त्याचा आजार बळावतो, हा सर्वसामान्य नियम सर्वच आजारांना लागू होणारा आहे. एचआयव्ही एड्स असणा:या रुग्णाला तर आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात, नियमित तपासणीसाठी जावे लागते. मात्र, याच गोष्टीला कंटाळून अनेक रुग्ण अध्र्यावरच औषधोपचार सोडून देतात. यापुढे असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने ‘उपचार सोडलेल्या रुग्णांचा फॉलोअप’ हा  उपक्रम सुरू केला आहे. आजवर सुमारे 3क् हजार रुग्णांनी अध्र्यावर उपचार सोडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एड्स झालेल्या रुग्णाला दर तीन महिन्यांनी तपासणीसाठी जावे लागते. या वेळी डॉक्टर दिलेली औषधे परिणाम करतात की नाही, हे तपासून रुग्णांना परत औषधे देतात. एड्समुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असल्यामुळे या रुग्णांना इतर आजारही जडतात. याला कंटाळून अनेकदा रुग्ण अध्र्यावरच उपचार सोडतात. यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावते. 2क्3क् र्पयत एड्सचे प्रमाण शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी रुग्णांकडे लक्ष केंद्रित करून नवनवीन उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. यावर एक उपाय म्हणजे रुग्णांचा फॉलोअप घेतला जाणार आहे. दोन महिन्यांमध्ये हा कार्यक्रम राबविणार आहे. 
कामानिमित्त व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहायला आलेली असते. या वेळी त्याला एड्स झाल्याचे निदान झाल्यास त्या ठिकाणी त्याची नोंदणी केली जाते. तिथेच त्याच्यावर औषधोपचार सुरू होतात. पण काही दिवसांनी अथवा महिन्यांनी तो परत घरी जातो. यामुळे तो ज्या केंद्रावर नावनोंदणी झाली असते, तिथे उपचाराला येत नाही. बांधकाम क्षेत्र, ट्रकचालक  या क्षेत्रंत काम करणा:या व्यक्तींची ठिकाणो नेहमीच बदलत असतात. यामुळे अनेकदा अशा रुग्णांनी उपचार अर्धवट सोडल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन न येण्याचे कारण शोधले जाणार असल्याचे संस्थेचे प्रकल्प संचालक खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. रुग्णाची नोंदणी होते, तेव्हा त्याची वैयक्तिक माहिती घेतली जाते. यामध्ये त्याचा फोन क्रमांक, घरचा पत्तादेखील घेतला जातो. आता जो रुग्ण औषधे घ्यायला येणार नाही, त्याच्या राहत्या घराचा जो पत्ता दिला असेल, तिथे जाऊन चौकशी करणार आहे.  (प्रतिनिधी)