Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा मार्केटिंग करण्यावर भर - राहुल गांधी

By admin | Updated: October 8, 2014 17:28 IST

भाजपाचे पंतप्रधान विकासाऐवजी मार्केटिंग करण्यावर भर देत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी महाडच्या एका सभेत बोलताना केला.

ऑनलाइन लोकमत 
महाड, दि. ८ - काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काम करणारे नेते आहे असे सांगत भाजपाचे पंतप्रधान विकासाऐवजी मार्केटिंग करण्यावर भर देत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी महाडच्या एका सभेत बोलताना केला. 
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधी यांची आज महाराष्ट्रात पहिलीच सभा पार पडली. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतला की ते आधी कॅमे-यासमोर जातात असा आरोप करीत मोदी व भाजपाचे लोक हे विकासाऐवजी मार्केटिंग करण्यावर भर देतात असे राहुल गांधी म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार हे गरीब विरोधी असून काँग्रेसने गरीबांविषयी बनविलेले कायदे मोदी सरकार बदलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. गरीबाला कँसर, डायबिटीससाठी ८ हजारामध्ये मिळणारी औषधी मोदी सरकारने लाखो रूपयाला केली असून मनरेगा, आदिवासी विधेयक, जमीन अधिग्रहन विधेयक यासारखी गरीबाला फायदेशीर असणारी कायदे केंद्र सरकार बंद खोलीत बसून बदलत असल्याचा घणाघाती आरोपही राहुल गांधी यांनी केला. चीनचे सैनिक लडाखमध्ये खूसघोरी करीत असताना पंतप्रधान मोदी हे चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी भेटत होते, अशी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.