Join us

चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्था पूर्णत्वास आली आहे.

यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे होणारी शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये केले जाईल. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे दरवर्षी पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा कोरोना पार्श्वभूमीवर दिल्या जाणार नाहीत. या नागरी सेवा-सुविधा अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही विशेष सुविधा यंदा दिल्या जाणार आहेत.