Join us
Daily Top 2Weekly Top 5

फुले रुग्णालयाचा आयसीयू सुरू

By admin | Updated: October 26, 2014 00:54 IST

विक्रोळीतील महापालिकेच्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयातील बंद पडलेला अतिदक्षता विभाग पुन्हा सुरू झाला आहे.

मनीषा म्हात्रे - मुंबई
विक्रोळीतील महापालिकेच्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयातील बंद पडलेला अतिदक्षता विभाग पुन्हा सुरू झाला आहे. हा विभाग बंद असून, रुग्णांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेने धावपळ करीत हा विभाग सुरू केला. त्यामुळे रुग्णालयांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
फुले रुग्णालय अखेरच्या घटका मोजत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तात महिनाभरापासून बंद असलेला अतिदक्षता विभाग आणि त्यापाठोपाठ येथील कर्मचा:यांनी आयसीयूही बंद केल्याने रुग्णांच्या गैरसोयीचा मागोवा घेण्यात आला. विक्रोळीसोबतच आसपासच्या उपनगरांतील शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी या रुग्णालयात येतात. मात्र येथे सुविधा उपलब्ध नसल्याची सबब पुढे करीत त्यांना येथील डॉक्टर अन्य रुग्णालयात धाडतात. 
विशेष म्हणजे या रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर व अन्य कर्मचारी, कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, हेही या वृत्तातून अधोरेखित करण्यात आले होते. वेतन न मिळाल्याने रुग्णालयातील कर्मचारी ऐन दिवाळीत निरुत्साही होते. दिवसभर काम करून योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे रुग्णालयातील कर्मचा:यांनी सोमवारी, 2क् ऑक्टोबर रोजी अतिदक्षता विभागच बंद केला. या विभागात एकूण 1क् खाटा असून, त्यातील रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले होते. 
‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेचा आरोग्य विभाग झोपेतून खडबडून जागा झाला. आरोग्य विभागाने तातडीने डॉक्टर व कर्मचा:यांचा तुंबलेला दोन महिन्यांचा पगार देऊ केला. तसेच बंद पाडण्यात आलेले आयसीयूही सुरू केले.