Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे जेईई परीक्षा देऊ न शकणाऱ्यांसाठी मिळणार एक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:06 IST

तारखा लवकरच जाहीर केल्या जाणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ...

तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षा २०२१ (सत्र ३) साठी एक संधी दिली जाणार आहे. जेईई मुख्य परीक्षा २०२१ (सत्र ३) परीक्षा २५ आणि २७ जुलैदरम्यान आहे. या परीक्षेला पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

मागील तीन ते चार दिवसापांसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला सूचना देत जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर या अडचणींमुळे पोहोचू शकणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.