Join us  

१ जूनपासून वैमानिकांची ड्युटी निश्चित करा; डीजीसीएची विमान कंपन्यांना तंबी

By मनोज गडनीस | Published: March 18, 2024 5:30 PM

निश्चित केलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून करण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत.

मनोज गडनीस, मुंबई : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे गेल्यावर्षी दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) वैमानिकांच्या कामांच्या वेळांचे नवे वेळापत्रक निश्चित केले आहे. मात्र, विमान कंपन्यांनी जरी या नव्या वेळापत्रकाला विरोध दर्शविला असला तरी, निश्चित केलेल्या याच वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून करण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत.

डीजीसीएने दिलेल्या आदेशानुसार वैमानिकांचे वेळापत्रक तयार करून तशी माहिती येत्या १५ एप्रिलपर्यंत डीजीसीएकडे सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दर तिमाहीला वैमानिकांच्या ताणासंदर्भातील अहवाल डीजीसीएला सादर करणे देखील विमान कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या विमानप्रवासाची वाढती संख्या व उड्डाणे लक्षात घेता डीजीसीएने निश्चित केलेले नियम विमान कंपन्यांना जाचक वाटत आहेत. मात्र, डीजीसीए आपल्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान, डीजीसीएने निश्चित केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, वैमानिकांना आठवड्याला ४८ तास आराम देणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच एका वैमानिकाला किमान दोन नाईट लँडिंग करू देण्याचे आदेशही दिले आहेत.

टॅग्स :मुंबईविमान