Join us

रिपाइंला हव्यात मुंबईतील पाच जागा

By admin | Updated: August 19, 2014 00:18 IST

महायुतीच्या जागावाटपात मुंबईतील पाच जागा मिळाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. संभाव्य 1क् जागांची यादीही महायुतीच्या नेत्यांना देण्यात आली आहे.

मुंबई : महायुतीच्या जागावाटपात मुंबईतील पाच जागा मिळाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. संभाव्य 1क् जागांची यादीही महायुतीच्या नेत्यांना देण्यात आली आहे. 
उद्या 19 ऑगस्ट रोजी रंगशारदा सभागृहात रिपाइंच्या मुंबई विभागीय कार्यकत्र्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या वेळी मुंबईतील जागांसाठी आक्रमक भूमिका घेत शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
कुर्ला (राखीव), चेंबूर, विक्र ोळी, वर्सोवा, चांदिवली, शिवाजीनगर मानखुर्द, अणुशक्तीनगर, धारावी, कुलाबा व भांडुप या जागांची मागणी करण्यात आली आहे. तर, राज्यभरात 57 जागांची मागणी पक्षाने केली असून किमान 2क् जागा मिळाव्यात, अशी पक्षाची मागणी आहे.
लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांचे विशेष सहकार्य मिळाले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत विशेष काळजी घेतली जाईल. मुंबईतील जास्तीतजास्त जागा जिंकण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात येणार असल्याचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)