Join us

थोडक्यात पाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST

मुंबई : कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि पालिका कोविड १९ लसीकरण केंद्रांवर २७ ...

मुंबई : कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि पालिका कोविड १९ लसीकरण केंद्रांवर २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

--

शिक्षकांचे लसीकरण

मुंबई : लसीकरण केंद्रांवर २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे कोविड लसीकरण होईल. याच दिवशी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही.

--

दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

मुंबई : कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनात उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

-

नोंदणी करा

मुंबई : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी https://transgender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तृतीयपंथी व्यक्तींनी या पोर्टलवर तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

--

मादाम कामा यांना आदरांजली

मुंबई : भारतीय तिरंगा ध्वज प्रणेत्या थोर वीरांगना मादाम कामा यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापौर दालनात मादाम कामा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी उपायुक्त संजय कुऱ्हाडे, महानगरपालिका चिटणीस संगीता शर्मा हे उपस्थित होते.