Join us
Daily Top 2Weekly Top 5

आणखी पाच गाडय़ांची तत्काळ तिकिटे महागणार

By admin | Updated: October 18, 2014 00:36 IST

एक्स्प्रेस आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तत्काळ तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून त्याची अंमलबजावणीही झाली आहे.

मुंबई : एक्स्प्रेस आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तत्काळ तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून त्याची अंमलबजावणीही झाली आहे. याच निर्णयानुसार मध्य रेल्वेवरील आणखी पाच एक्स्प्रेस गाडय़ांची तत्काळ तिकिटे महागणार आहेत.
रेल्वेची तिकिटे मिळवताना वेटिंग लिस्टचा सामना प्रवाशांना करावा लागत असल्याने प्रवासी तत्काळ तिकिटांचा पर्याय निवडतात. मात्र अशा तत्काळ तिकिटांच्या किमतीतही वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने नुकताच घेतला. या नव्या नियमानुसार तत्काळ कोटय़ातील 5क् टक्के तिकिटांची बुकिंग झाल्यानंतर उर्वरित 5क् टक्के तिकिटांची बुकिंग प्रवाशांना प्रीमियम तत्काळ कोटय़ाप्रमाणो डायनेमिक दराच्या आधारावर मिळतील, असे सांगण्यात आले. यामध्ये उर्वरित 5क् टक्क्यांनंतर दिली जाणारी तिकिटे 2क् टक्के दरवाढीने प्रवाशांना मिळतील. मध्य व पश्चिम रेल्वेवर 3 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी झाली. आता 19 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेवरील आणखी पाच गाडय़ांत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 12859 सीएसटी ते हावडा गीतांजली एक्स्प्रेस, 11क्19 सीएसटी ते भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, 12149 पुणो ते 
पटणा एक्स्प्रेस, 12322 सीएसटी ते हावडा कोलकाता मेल आणि 12163 दादर ते चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेससाठी हा नियम लागू होईल. (प्रतिनिधी)