मुंब्रा : येथील सिद्धार्थनगर परिसरात बायपासवर गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रेलर आपसात धडकून झालेल्या अपघातात एक ट्रेलर पुलावरून खाली कोसळल्याने पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये 2 लहान मुलांचा समावेश असून या सर्वावर उपचार सुरू आहेत.
नवी मुंबईच्या दिशेने जाणारे दोन ट्रेलर बायपासवर ओव्हरटेक करण्याच्या बेतात असताना त्यापुढील एका ट्रकने अचानक करकचून ब्रेक दाबला. त्यामुळे मागील दोन्ही ट्रेलर एकमेकांवर धडकले. यात डावीकडील ट्रेलर पुलावरून खाली कोसळला. त्यात घरातील अपसरीन तळवसकर (5क्), यासीन नफीस तळवसकर (13), अम्मू (9), अल्ताफ (8) आणि जितेंद्र जयस्वाल (31) यांच्यासह ट्रेलरचालक राम प्रजापती (35) हे जखमी झाले. त्यांना तातडीने कळवा येथील शिवाजी हॉस्पिटलात दाखल केले. (प्रतिनिधी)