Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ लोकोमध्ये मिनीट्रेनची पाच इंजिने तयार

By admin | Updated: June 14, 2017 03:10 IST

मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक गेल्या तेरा महिन्यांपासून बंद आहे. दरम्यानच्या काळात मिनीट्रेनसाठी रेल्वे विभागाने तीन नवीन इंजिने तयार केली आहेत. त्या सर्व इंजिनाच्या

- अजय कदम। लोकमत न्यूज नेटवर्क

माथेरान : मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक गेल्या तेरा महिन्यांपासून बंद आहे. दरम्यानच्या काळात मिनीट्रेनसाठी रेल्वे विभागाने तीन नवीन इंजिने तयार केली आहेत. त्या सर्व इंजिनाच्या कार्यप्रणालीत बदल करण्यासाठी ती सर्व इंजिने नेरळ तेथून कुर्ला मुंबई येथील रेल्वेच्या कार्यशाळेत नेण्यात आली होती. ती सर्व इंजिने आता पुन्हा नेरळ लोकोच्या ताफ्यात रु जू झाली आहेत. नेरळ लोकोमध्ये आजच्या घडीला सुस्थितीत असलेली पाच इंजिने आहेत. एनडीएम १-४०२ हे इंजिन मंगळवारी नेरळ येथून दुपारी नॅरोगेज मार्गावर चाचणी घेण्यासाठी निघाले.नेरळ - माथेरान मिनीट्रेन ही शतक महोत्सव साजरा करणारी नॅरोगेजवर धावणारी मिनीट्रेन गतवर्षी किरकोळ अपघातामुळे अनिश्चित काळासाठी बंद ठेवली होती. आता पुन्हा एकदा मिनीट्रेन नॅरोगेज ट्रॅकवर येण्याची शक्यता असून मिनीट्रेन चालविण्यासाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण कारण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न दिसून येत आहे. मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक बंद असताना रेल्वेकडून मिनीट्रेनसाठी तीन नवीन इंजिने तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. त्यात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी कुर्ला येथील कार्यशाळेत तीन इंजिनांची बांधणी केली आहे. एनडीएम १-४००, एनडीएम १-४०१, एनडीएम १-४०२ अशी तीन इंजिने मुंबई येथून नेरळ लोकोमध्ये यापूर्वीच पोहचली आहेत. ही तिन्ही नवीन इंजिने रेल्वेच्या अभियंत्यांनी एअर ब्रेक प्रणालीची बनविली होती. यापूर्वीपासून नेरळ- माथेरान मिनीट्रेन ही हॅन्डब्रेक प्रणालीने चालविली जात होती. त्यामुळे या तिन्ही इंजिनांमध्ये तात्पुरते फेरबदल करण्यासाठी तिन्ही नवीन इंजिने नेरळ येथून कुर्ला येथील कार्यशाळेत नेली जात होती. मे महिन्यापासून ही नवीन इंजिने कुर्ला येथील कार्यशाळेत नेवून हॅन्डब्रेक कार्यप्रणाली कार्यान्वित करून पुन्हा नेरळ येथे आणण्यात येत आहेत. त्यातील एनडीएम १-४०२ हे इंजिन ११ जून रोजी पुन्हा नेरळ येथे हँडब्रेक कार्यप्रणालीत वर्ग करून नेरळ येथे पोहचले आहे. त्यामुळे नवीन एनडीएम १ या जातीची तीन इंजिने, एनडीएम ५५० आणि ५५१ ही दोन अशी पाच इंजिने नेरळ लोकोमध्ये मिनीट्रेन चालविण्यासाठी सज्ज आहेत. एनडीएम ७९४ बी हे इंजिन देखील मिनीट्रेनच्या ताफ्यात सैर करण्यासाठी सज्ज आहे. या सर्वात वाफेवर चालणाऱ्या इंजिनांचे काही वर्षांपूर्वी डिझेलमध्ये रूपांतरित के लेहोते.