Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा, शीळफाटा येथील पाच वीजचोरांना अटक

By admin | Updated: December 6, 2015 02:50 IST

भांडुप नागरी परिमंडळातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तिकरीत्या वीजचोरीविरोधात केलेल्या धडक कारवाईत मुंब्रा आणि शीळफाटा परिसरातील पाच

मुंंबई : भांडुप नागरी परिमंडळातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तिकरीत्या वीजचोरीविरोधात केलेल्या धडक कारवाईत मुंब्रा आणि शीळफाटा परिसरातील पाच वीजग्राहकांना महावितरणच्या पोलिसांनी अटक केली.भारनियमनमुक्त अभियानाच्या अनुषंगाने सप्टेंबर, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तब्बल ११२ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये तब्बल १ कोटी २४ लाखांची वीजचोरी झाल्याचे उघड झाले होते. याच कारवाईमधील तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची वीजचोरी केलेल्या राममिलन जगन्नाथ मौर्य, योगेश रामभाऊ जाधव, वैभव पंढरीनाथ पाटील, नबीब अहमद खान आणि रामसिंग यादव यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)