Join us

महापालिकेतही आजपासून पाच दिवसांचा आठवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:17 IST

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता मुंबई महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा लागू झाला आहे.

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता मुंबई महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. याची सुरुवात मार्च महिन्यातील पहिल्या शनिवारपासून होत आहे. विशेष म्हणजे मंगळवारी धूलिवंदनानिमित्त सरकारी कार्यालय बंद असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवार आणि मंगळवार असे तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. मात्र नवीन वेळेनुसार यापुढे पालिकेचे कार्यालय सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत सुरू राहणार आहे.राज्य सरकारच्या कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार पाच दिवसांच्या आठवड्याचा लाभ देण्यात येत आहे. याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेच्या कर्मचाºयांसाठी करण्यात आली आहे. याबाबतच्या मसुद्यावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून कामगार संघटनांच्या शंकेचे निरसन करण्यातही यश आले आहे़