Join us  

धारावीतील झोपडपट्टीत मरकजहून परतलेल्या पाच दाम्पत्यांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 11:44 AM

दिल्लीतील मरकजहून परतलेल्या पाच दाम्पत्यांनी धारावीतील झोपडपट्टीत वास्तव्य केले असल्याचे समोर येत आहे. 

मुंबई :  दिल्लीतील मरकजहून परतलेल्या पाच दाम्पत्यांनी धारावीतील झोपडपट्टीत वास्तव्य केले असल्याचे समोर येत आहे.  धक्कादायक बाब म्हणजे धारावीत कोरोनामुळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तेथे पाच महिला तर  त्यांचे पती परिसरातील मशिदीत वास्तव्यास होते, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे.  त्यांनुसार ही मंडळी ज्या ज्या व्यक्तिच्या संपर्कत आली त्यांचा शाहू नगर पोलिसांकड़ून शोध सुरु आहे.

पाचही दाम्पत्य केरळचे रहिवासी आहेत. याबाबत यंत्रणाना माहिती मिळताच त्यांनी या दाम्पत्यांची तपासणी केली. तेव्हा त्यांच्यापैकी काही जण कोरोनाबाधीत असल्याचे समजते आहे. त्यामुळे शाहू नगर पोलिसांनी ही मंडळी ज्या ज्या व्यक्तिच्या संपर्कात आली त्या व्यक्तिसह वास्तव्यास असलेली इमारत मशीदीसह विविध ठिकाणांचा शोध सुरु केला आहेत. तसेच येथील रहिवाशांच्या वैद्यकीय तपासणी सुरु आहे. पाच दाम्पत्यांव्यतिरिक्त आणखी तीघे मरकजहून परतले असून त्यांना दोन आठवड्यांसाठी घरीच राहाण्याच्या सूचना आरोग्य अधिका-यांनी दिल्या असल्याचीही माहिती समजते. शिवाय कोरोना मुळे मृत्यू झाल्यानंतर संबंधीत व्यक्ती वास्व्यास असलेल्या इमारतीसह सुमारे ९० दुकाने पालिकेने ताब्यात घेतली आहे.

त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लक्षण दिसत असल्यास तपास यंत्रणाना सहकार्य करण्याचे आवाहनही पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस