Join us

रानगांवातून पाच बांगलादेशी अटकेत

By admin | Updated: June 2, 2014 04:03 IST

वसई परिसरात समाजसेवा शाखेने मागील काही महिन्यांत केलेल्या कारवाईमुळे वसई भागातील अनेक बेकायदा वास्तव्य करणारे बांगलादेशी नाहीसे झाले होते.

नायगाव : वसई परिसरात समाजसेवा शाखेने मागील काही महिन्यांत केलेल्या कारवाईमुळे वसई भागातील अनेक बेकायदा वास्तव्य करणारे बांगलादेशी नाहीसे झाले होते. वसईतील रानगांव येथे केलेल्या कारवाईत वसई पोलिसांनी पाच जणांना अटक करून गुन्हे दाखल केले. लालु सरदार (६२), महम्मद मकबुल हसन (२५), मुसमद मोहम्मद (२१), शौकत नवाब अली (३०), मोनुर इस्लाम (३२) मुळ रा. कौलखा, जि. सातकीय बांगलादेश अशी अटक आरोपींची नावे आहेत. ८ ते १०जण संशयास्पद असल्याने त्यांच्याकडील दस्तवेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रभारी अधिकारी महेश्वर रेड्डी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यानंतर या भागात कारवाईची शक्यता आहे. वसई पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक वराडकर करीत आहेत.