Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘महा’ वादळामुळे मासेमारीवर सावट; खराब हवामानामुळे ९० दिवसांपासून मासेमारी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:47 IST

शून्य व्याजाने कर्ज उपलब्ध करून घ्यावे. थकीत डिझेल परतावा तत्काळ मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबई : खराब हवामानामुळे गेल्या ९० दिवसांपासून राज्यातील मासेमारी झाली ठप्प असून शेतकऱ्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या आठवड्यात चक्रीवादळ ‘क्यार’मुळे राज्यातील मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा प्रभाव जास्त असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील काही मासेमारी नौका पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर काही नौकांचे किरकोळ नुकसान झाले.

आता ‘महा’ वादळामुळे मासेमारीवर सावट आले असून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी माघारी परतल्या आहेत. या कारणात्सव राज्यातील मच्छीमारांची नुकसानीची पाहणी करून त्यांना राज्य सरकारने १०० कोटी रुपये व केंद्र सरकारने १०० कोटी रुपये आर्थिक नुकसानभरपाई द्यावी. शून्य व्याजाने कर्ज उपलब्ध करून घ्यावे. थकीत डिझेल परतावा तत्काळ मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.