Join us  

"पर्ससीन एलईडी, पर्ससीन नेट विंध्वसक मासेमारीविरोधात मच्छिमार राज्यभर आंदोलन करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 3:15 PM

पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट या विंध्वंसकमासेमारीबाबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांची आज मढ कोळीवाड्यात भेट घेतली असता त्यांनी समितीची भूमिका विषद केली. (Fishermen)

मुंबई- पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट या विंध्वसक मासेमारी बंदीबाबत राज्य सरकारने त्वरीत निर्णय घेतला नाही तर  राज्यभर मच्छिमारांचे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने दिला आहे. (Fishermen will protest across the state against purse seine LED and purse seine net fishing)

पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट या विंध्वंसकमासेमारीबाबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांची आज मढ कोळीवाड्यात भेट घेतली असता त्यांनी समितीची भूमिका विषद केली.

पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट मासेमारी या विध्दवंसक मासेमारी बंदीबाबतचा व नौका जप्त करण्यासंदर्भातील मसूदा तयार आहे. जिल्हा सल्लागार समितीच्या बैठका संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक घेत नाहीत. मोठ्या प्रमाणात अर्थिक देवाणघेवाण करून जे कायदे आहेत, त्यांची अंमलबजावणी करीत नाहीत. परिणामी समुद्रातील मत्स्य संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

एलईडी पर्ससीन व पर्ससीन नेट मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने त्याची त्वरीत दखल घेऊन विंध्वसक एलईडी पर्ससीन, पर्ससीन नेट व हाय स्पीड मासेमारीवर बंदी आणावी. अन्यथा महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती राज्यभर आंदोलन उभे करेल, असा इशारा किरण कोळी यांनी दिला आहे.

मंडणगड गुहागर दापोली मच्छिमार संघर्ष समितीच्या अंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने काल दापोली, रत्नागिरी येथे अंदोलनात भाग होऊन समर्थन दिले. तसेच मालवण, सिंधुदुर्ग येथे सुरू असलेल्या अंदोलनातील नेते मिथुन मालवणकर यांच्याशी मोबाईल फोन वरून चर्चा करून त्यांना  पाठिंबा जाहिर केला, अशी माहिती त्यांनी दिली.

या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल,  किरण कोळी, मोरेश्र्वर कोळी व अनिल तांडेल तसेच दापोली मंडणगड गुहागर मच्छिमार संघर्ष समितीचे कार्यध्यक्ष बाळकृष्ण पावसे, उपाध्यक्ष  प्रकाश रघुवीर, सचिव गोपीचंद चोगले, सदस्य महिंद्र चोगले, सोमनाथ पावशे आदी उपस्थित होते.

टॅग्स :मच्छीमारमुंबईराज्य सरकार