Join us
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात मच्छीमारी नौकेची लोखंडी बार्जला धडक

By admin | Updated: June 1, 2015 22:23 IST

समुद्रात गेल्या चार महिन्यांपासून नांगर टाकून उभ्या असणाऱ्या लोखंडी बार्जला धडक लागल्याने चौल चुने कोळीवाडा येथील अरुणा बाजी यांच्या

बोर्ली-मांडला : समुद्रात गेल्या चार महिन्यांपासून नांगर टाकून उभ्या असणाऱ्या लोखंडी बार्जला धडक लागल्याने चौल चुने कोळीवाडा येथील अरुणा बाजी यांच्या मच्छीमारी बोटीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अरुणा बाजी यांची मासेमारी नौका (रत्नप्रभा आयएनडी एमएच-३-एमएम-६३०) ही मासेमारीकरिता समुद्रात गेली असता पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान लोखंडी बार्जला टक्कर होवून अपघात झाला. यात मासेमारी नौकेचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. समुद्रात लोखंडी बार्ज हा गेल्या चार महिन्यांपासून लागला आहे. त्याच्यावर रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारची लाईट किंवा सिग्नल लावलेला नसतो. त्यामुळे हा अपघात घडलेला आहे. सदर लोखंडी बार्जबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसून सदरच्या बार्जबाबत कस्टम व पोर्ट आॅफिस यांना कल्पना देण्यात आली आहे. (वार्ताहर)