Join us

छत्रपती शिवाजी महाराज मंडईत मासळी विक्रेत्यांना संध्याकाळी चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत मासे विक्रीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई-क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई मोडकळीस आल्याने तत्काळ खाली करण्याचे आदेश दिले. मासळी विक्रेत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई मोडकळीस आल्याने तत्काळ खाली करण्याचे आदेश दिले. मासळी विक्रेत्या महिलांना पर्यायी जागेचे कोणतेच नियोजन नसल्याने अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्रावर म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मासे विक्रेत्या कोळी महिलांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीची याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

त्याच जागी संध्याकाळी चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत मासळी विक्री करण्यास परवानगी दिली आहे. लवकरच पत्राचे शेड काढून मासे विक्रीचा व्यवसाय चालू केला जाईल, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मासेविक्रीची पर्यायी जागा तात्पुरत्या स्वरूपात दिल्याने मच्छिमारांनी पहिली लढाई जिंकल्याचे समाधान तांडेल यांनी व्यक्त केले. -------------------------------------------------