Join us
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू

By admin | Updated: October 27, 2014 23:39 IST

बेलापूर गावातील तलावामध्ये दूषित पाण्यामुळे अचानक माशांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : बेलापूर गावातील तलावामध्ये दूषित पाण्यामुळे अचानक माशांचा मृत्यू झाला आहे. मेलेल्या माशांचा खच पाहून स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यास महापालिका अपयशी ठरत असल्याचे या घटनेतून सिद्ध झाले आहे.
नवी मुंबईमध्ये 24 तलाव आहेत. परंतु यामधील बहुतांश तलाव दूषित झाले आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून अनेक ठिकाणी गॅबीयन वॉल टाकल्या आहेत, परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. बेलापूर गावच्या तलावामध्ये माशांचा मृत्यू झाला. सोमावारी सकाळी तलावाच्या पाण्यावर मृत माशांचा खच स्थानिकांना दिसला. याविषयी नागरिकांनी महापालिका अधिका:यांना संबंधित घटनेची माहिती दिली. दरम्यान, अचानक इतक्या मोठय़ा संख्येने मासे कशामुळे मेले, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर तलावात दूषित पाणी सोडल्याने माशांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक नगरसेवक अमित पाटील यांनी या घटनेविषयी महापालिकेच्या अधिका:यांना माहिती दिली तसेच तलावामधील पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली.