Join us  

मुंबई विद्यापीठावर ३४ वर्षांत पहिल्यांदा अपात्रतेची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 3:34 AM

पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी झालेली विद्यार्थिनी अपात्र ठरल्यामुळे मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण संघ बाद ठरला आहे.

मुंबई : पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी झालेली विद्यार्थिनी अपात्र ठरल्यामुळे मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण संघ बाद ठरला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाची बदनामी होत असून, गेल्या ३४ वर्षांत पहिल्यांदा हा प्रकार घडल्याने सिनेट सदस्यांनी या संदर्भात कुलगुरूंशी चर्चा करून जाब विचारला आहे. यावर या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर करावी करण्याचे आश्वासन युवासेनेला आणि सिनेट सदस्यांना विद्यपीठाचे प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी दिले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘युवास्पंदन’ या ३४व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघातील एक विद्यार्थिनी अपात्र असल्याची तक्रार आयोजकांकडे करण्यात आली.त्यामुळे अखिल भारतीय विद्यापीठ महासंघाचे समन्वयक व आयोजक यांनी विद्यापीठाला संबंधित विद्यार्थिनीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले, तसेच समन्वयक आणि निरीक्षकांनी संबंधित विद्यार्थिनी व विद्यापीठातील समन्वयकांची सुनावणीही घेतली. यानंतर, सादर झालेली कागदपत्रे व सुनावणी यावरून असे लक्षात आले की, संबंधित विद्यार्थिनी विद्यापीठात दहावी पात्रतेनंतर करण्यात येणाºया पदविका अभ्यासक्रमात शिकत आहे.मात्र, महासंघाच्या नियमांनुसार किमान शैक्षणिक पात्रता बारावी असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये शिकणाºया म्हणजे, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाच युवा महोत्सवात सहभागी होता येते. यामुळे संबंधित विद्यार्थिनीला बाद करण्यात आले. संघातील एक सदस्य बाद झाला, तर संपूर्ण संघच बाद करण्यात येतो, या नियमानुसार मुंबई विद्यापीठाचा संघच या स्पर्धेतून बाद करण्यात आला, असे विभागीय स्पर्धेच्या आयोजकांकडून सांगण्यात आले.दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण विभाग संबंधित अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे विद्यापीठावर पुढील २ वर्षे सहभागी न होण्याची नामुष्की ओढवली असल्याने, विद्यापीठाचे अधिकारी यासाठी जबाबदार आहेत.संबंधित अधिकाºयाना जबाबदार धरून निलंबन करण्याची मागणी युवासेना सिनेट सदस्य शशिकांत झोरे, वैभव थोरात आणि इतरांकडून लेखी निवेदन करण्यात आली आहे.कुलगुरूंकडून विद्यार्थिनीचे अभिनंदनएसएनडीटी महिला विद्यापीठाने महोत्सवात ११ कलाप्रकारांत प्रावीण्य दाखवत राष्ट्रीय पातळीची पात्र ठरले आहेत. याच्याशिवाय ‘युवास्पंदन’ महोत्सवाच्या उपविजेत्या पदावर बाजी मारली आहे.एकूण पाच मुख्य प्रकारातील ललितकला व नृत्य यामध्ये जेतेपद व सर्वसाधारण उपविजेते पद मिळाले आहे. कुलगुरू शशिकला वंजारी यांनी विजेत्या संघाचे आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण क्षेत्र