Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पावसात दरड कोसळली

By admin | Updated: June 14, 2015 02:11 IST

पहिल्या पावसाच्या सरींनी उपनगरांतील अनेक भाग जलमय झाले. तर डोंगराळ भागात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली. डी. एन नगर येथे दरड

मुंबई : पहिल्या पावसाच्या सरींनी उपनगरांतील अनेक भाग जलमय झाले. तर डोंगराळ भागात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली. डी. एन नगर येथे दरड कोसळून दोन जण जखमी झाल्याच्या घटेनेपाठोपाठ भांडुपमध्ये हनुमान नगर परिसरात शनिवारी सकाळी दरड कोसळून दोन घरांचे नुकसान झाले.हनुमान नगर हा परिसर डोंगरात वसलेला आहे. शनिवारी सकाळी डोंगरावरले मोठे दगड चाळींवर पडले. त्यात दोन घरांचे नुकसान झाले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. यापूर्वी शुक्रवारी सकाळच्या सुमारास डी.एन नगर येथील गिल्बर्ट हिल येथील गावदेवी डोंगर परिसरातील काही भाग कोसळला. यामध्ये अविनाश सिंग (२९) या रिक्षाचालकासह साजिद सय्यद (३६) हे व्यापारी जखमी झाले आहे. दोघांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई शहरात ४९ तर उपनगरांत २७८ दरडी आहेत.