Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुख शांतीसाठी आधी बतावणी, नंतर देव्हाऱ्यातील दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Updated: September 25, 2023 14:48 IST

सुरुवातीला सगळ्या गोष्टी तिने कोण्या महाराजाच्या नावावर ढकलल्या.

मुंबई: सोन्याचे दागिने देव्हाऱ्यात ठेवल्यावर घरात सुख-समृद्धी नांदेल असे जान्हवी सावर्डेकर (४५) नावाच्या महिलेने मालाडला राहणाऱ्या रेखा गाला (५०) या गृहिणीला सांगितले होते. तिला हे एका महाराजाने सांगितले असल्याचाजी दावा तिने केल्याने गालाने तिच्यावर विश्वास ठेवत त्यांचे दोन लाख रुपयांचे दागिने डब्यात भरून देव्हाऱ्यात ठेवले. त्यानंतर सावर्डेकर हिने ते दागिने पळवून नेले.

सुरुवातीला सगळ्या गोष्टी तिने कोण्या महाराजाच्या नावावर ढकलल्या. मात्र नंतर तिनेच ती चोरी केल्याची कबुली गालांकडे दिली.तसेच दागिनेही परत देईन असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात तिने तसे न करता फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी गाला यांनी मालाड पोलिसात तिच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानुसार पोलिसांनी तपास करत सावर्डेकर हिला अटक केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.