मुंबई : लाल दिव्याच्या गाडीचा वाद कायम असताना महापौर स्नेहल आंबेकर यांना पहिल्याच दिवशी विरोधकांचा सामना करावा लागला़ उपमहापौर पदाच्या निवडणुकीत व्यत्यय आणून सभागृहात प्रवेश करणा:या ठाकरे कुटुंबीयांच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी आपल्या पक्षश्रेष्ठींच्या प्रतिमा महासभेत आणल्या़ यामुळे काश्मीर खो:यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलाविलेली बैठक महापौरांना काही मिनिटांतच गुंडाळाली़
9 सप्टेंबरला नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व कुटुंबीय सभागृहात आले होत़े यावर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला होता़ मात्र आंबेकर यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या
सभेमध्ये आज काँग्रेसने पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी व राष्ट्रवादीने
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमा आणल्या़ ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभागृहात प्रवेश करून घटनाबाह्य काम केले, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आह़े
विरोधी पक्षांनी आपल्या नेत्यांच्या प्रतिमा आणल्या़ काहींनी या प्रतिमा व्यासपीठावर नेण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे गटनेत्यांच्या भाषणाऐवजी महापौरांनीच काश्मीरमधील मृतांबाबत शोक व्यक्त करीत बैठक तहकूब केली़ (प्रतिनिधी)
सभागृहाचे कामकाज सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सभेत येऊन घटनाबाह्य काम केले आह़े मात्र याबाबत महापौर भूमिका स्पष्ट करीत नाहीत, असा संताप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी व्यक्त केला़ तर काश्मीरमध्ये मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात विरोधी पक्षांनी असा अडथळा आणण्याची गरज नव्हती, अशी तिखट प्रतिक्रिया महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिली आह़े