Join us
Daily Top 2Weekly Top 5

एफवायची पहिली यादी २२ जूनला

By admin | Updated: June 17, 2017 01:01 IST

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची घाई सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठ यंदा तेरावीच्या

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची घाई सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठ यंदा तेरावीच्या अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया राबवत आहे. त्याची पहिली यादी २२ जून रोजी लागणार असल्याचे मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या सर्व महाविद्यालयांची तेरावीची आॅनलाइन प्रवेशपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. कार्यालयीन दिवसांत २१ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना तेरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहेत, तर कोणत्या महाविद्यालयात जागा रिक्त राहिल्यास, ४ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली यादी जाहीर करण्यात येईल.