मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या ४५ टक्के म्हणजे ७ हजार ९१० कोटी इतका कर्जाचा पहिला हफ्ता देण्यासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था आणि एमएमआरडीए दरम्यान करार करण्यात आला. हा करार जायकाचे मुख्य प्रतिनिधी साकामोटो आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस.मदान, वित्तविभागाचे सहसचिव सेल्वकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दरम्यान, या प्रकल्पासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. प्रकल्पासाठी आम्ही यापूर्वीच कंत्राटदारांची शॉर्ट लिस्ट तयार केली आहे, असे मदान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ट्रान्स हार्बर लिंकसाठी पहिला हप्ता
By admin | Updated: April 1, 2017 04:04 IST